Question

'आपलेच दात आपलेच ओठ' या म्हणीचा अर्थ-

A

आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे

B

स्वत:पुरते कमवणे

C

फक्त स्वत:चाच फायदा साधून घणे

D

आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे

Text Solution
Verified by Experts

म्हण  : 

  • ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
  • ​जेव्हा आपल्याच माणसाने आपल्याला त्रास दिल्यावर किंवा आपल्याबरोबर काही चूक/वाईट  केल्यावर जी अडचणीची स्थिती निर्माण होते त्यालाच आपलेच दात आपलेच ओठ असे म्हणतात .
  • ​म्हणून वरील म्हणीचा अर्थ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे हा आहे .​

Updated on:21/07/2023