Question

येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली इत्यादी शब्दारुपावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? अ. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ब. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ड. केवल प्रयोगी अव्यय

A

अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक

B

ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक

C

क फक्त बरोबर बाकी सर्व चूक

D

ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

Text Solution
Verified by Experts

उत्तर- येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली इत्यादी शब्दरुपावरून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा बोध होतो.

Important Points क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्‍या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यामधील क्रिया कोठे घडली हे दर्शवणारा शब्द असतो.

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय याचे दोन उपप्रकार पडतात.

अ) स्थितीदर्शक -

उदाहरणे - जवळ, खाली, वर, जेथे, तेथे, मध्ये, अलीकडे, पलीकडे इत्यादी

ब) गतिदर्शक - गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारा शब्द होय.

उदाहरणे - समोरून, खालून, दुरून, तिकडून, लांबून, वरून, जवळून इत्यादी

Additional Information कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा काळ दर्शविणारा शब्द होय.

उदाहरणे - दिवसा, काल, आता, रात्री, दिवसभर, वेळोवेळी, वारंवार इत्यादी

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात.

अ) कालदर्शक - कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया केव्हा घडली हा काळ दर्शविण्याचे काम करणारा शब्द होय.

उदा. तेव्हा, दिवसा, उद्या, रात्री, आता, परवा इत्यादी

ब) सातत्यदर्शक - वाक्यामध्ये क्रियाचे सातत्य दर्शविणारा शब्द.

उदा. हमेशा, दिवसभर, आजकाल, नेहमी, सतत इत्यादी

क) आवृत्तीदर्शक - वाक्यामध्ये घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा शब्द.

उदा. रातोरात, पुन्हापुन्हा, वारंवार, सालोसाल, दररोज इत्यादी

रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय - वाक्यामधील क्रिया नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.

उदा. करकर, पटदिशी, उगीचच

केवलप्रयोगी अव्यय - आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

हर्षदर्शक - अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो

शोकदर्शक - आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे

आश्चर्यदर्शक - ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

प्रशंसादर्शक - छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

संमतीदर्शक - ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

विरोधदर्शक - छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

तिरस्कारदर्शक - शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

संबोधनदर्शक - अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

मौनदर्शक - चुप, चुपचाप, गप, गुपचुप

Updated on:21/07/2023