Question
'फुगडीचा फेर धरला आहे' या वाक्यात अलंकार आहे-
A
अनुप्रास
B
रुपक
C
यमक
D
वक्रोक्ति
Text Solution
अनुप्रास
रुपक
यमक
वक्रोक्ति
'फुगडीचा फेर धरला आहे' हे वाक्य यशवंतराव चव्हाण लिखित एका साहित्य लेखातील आहे.
यांत त्यांनी कृष्णा, वेण्णा, कोयना, भागीरथी आणि सरस्वती या पाच नद्यांचा उगम महाबळेश्वर मधून होतो याचे अत्यंत सुंदर व मनमोहक वर्णन केले आहे.
रूपक अलंकार-
लक्षण- जेव्हा उपमेय व् उपमान हे एकच आहेत, ते भिन्न नाही असे वर्णन येते तेथे रूपक अलंकार होतो.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पाच नद्या एकत्र आल्यावर जणू काही अशा दिसतात जसे काही त्यांनी 'फुगडीचा फेर धरला आहे'.
येथे त्या पाच नद्या म्हणजे उपमेय आहे आणि त्यांनी फुगडीचा फेर धरला आहे ही कल्पना म्हणजे उपमान होय.
अशाप्रकारे उपमेयावर उपमानाचा आरोप केला असल्याने आणि पाच नद्यांनी फुगडीचा फेर धरला आहे असेच सांगितल्याने येथे रूपक अलंकार होतो.