Question

'आपली पाठ आपल्याला दिसत नाही.' या म्हणीची समानार्थी म्हण

A

दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.

B

दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.

C

आपला हात जगन्नाथ.

D

एका हाताने टाळी वाजत नाही.

Text Solution
Verified by Experts

म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.

आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीची समानार्थी म्हण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही ही होईल.

आपली पाठ आपल्याला दिसत नाही याचा अर्थ स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही याचा पण अर्थ आपण दुसऱ्याचे दोष दाखवतो पण स्वार्थामुळे स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाही असा होतो.

Additional Information

आपला हात जगन्नाथ याचा अर्थ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते असा होतो.

एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही असा होतो.

दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी याचा अर्थ जिवलग दोन व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे असा होतो.

Updated on:21/07/2023