Question
'मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्या वर पाठवावा' या वाक्यात कोणते आख्यात वापरले आहे ?
A
लाख्यात
B
वाख्यात
C
ई-आख्यात
D
प्रथम ताख्यात
Text Solution
लाख्यात
वाख्यात
ई-आख्यात
प्रथम ताख्यात
आख्यात विचार-
क्रियापदामध्ये होणाऱ्या बदलांना आख्यात विचार असे म्हणतात.
ते बदल ५ प्रकारे होत असतात.
काळानुसार होणाऱ्या बदलांचे प्रकार-
काळ | आख्याताचे नाव | उदाहरण |
वर्तमानकाळ | प्रथम ता आख्यात | करते |
भूतकाळ | ला आख्यात | करत होती |
रीति भूतकाळ | ई आख्यात | करत असे |
भविष्यकाळ | इलाख्यात | करेन |
आज्ञार्थी | ऊ आख्यात | कर |
विध्यर्थी | वाख्यात | करावा |
संकेतार्थी | द्वितीय ता आख्यात | करू शकशील |
अशाप्रकारे 'मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्या वर पाठवावा' हे वाक्य विध्यर्थी वाक्य आहे आणि त्यामुळे या आख्याताचे नाव वाख्यात असल्याने हाच पर्याय योग्य राहील.