Question

पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात.

A

जोडा, कवी

B

पोर, बाग

C

देव, हत्ती

D

बोकड, आकाश

Text Solution
Verified by Experts

लिंगनामावरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही पुरुष जातीची किंवा स्त्रीजातीची आहे की या दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही हे कळते त्यालाच लिंग असे म्हणतात.

लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंग 
  2. स्त्रीलिंग 
  3. नपुंसकलिंग 

) पुल्लिंगनामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंगी असे म्हणतात.

उदा : राम, मुलगा 

) स्त्रीलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.

उदा :  मुलगी, नदी 

) नपुंसकलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा : फुल, घड्याळ 

वरील प्रश्नात पर्याय  २ वगळता इतर सर्व पर्याय हे एकाच लिंगात मोडतात. तर पोर आणि बाग हे शब्द विविध लिंगात मोडतात.

पोर हा शब्द पुल्लिंगी,स्त्रीलिंगी,आणि नपुसकलिंगी या तिन्ही लिंगामध्ये आढळतात. तर बाग हा शब्द स्त्रीलिंगी या लिंगामध्ये आढळतो.

म्हणून पोर,बाग हा पर्याय योग्य आहे.

Updated on:21/07/2023