Question

जो आपले काम करीत राहतो, तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील कर्म, कर्मविस्तार व विधेयपूरक हे घटक कोणते ? (अ) मनुष्य - जो - देवाला (ब) जो - आपले राहतो - प्रिय (क) काम - आपले - देवाला प्रिय (ड) काम करीत - मनुष्य - देवाला

A

फक्त (अ) व (क) अचूक आहे.

B

फक्त (क) पर्याय अचूक आहे.

C

फक्त (अ) व (ब) अचूक आहे.

D

फक्त (ड) पर्याय अचूक आहे.

Text Solution
Verified by Experts

कर्म : जो शब्द वाक्यात झालेली क्रिया दर्शवित असतो त्याला कर्म असे म्हणतात.

वरील वाक्यात काम हे कर्म आहे.

कर्मविस्तार : कर्मविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द जर कर्मापूर्वी आला तर त्याला कर्मविस्तार असे म्हणतात.

वरील वाक्यात काम या कर्मविषयी आपले हा शब्द अधिक माहिती सांगत असल्याने व तो कर्मापूर्वी आल्याने तो कर्मविस्तार आहे.

विधेयपूरक : कर्ता आणि क्रियापद सोडून इतर दुसरा कुठलाही शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्या शब्दाला विधेयपूरक असे म्हणतात.

वरील वाक्यात कर्ता व क्रियापद सोडून देवाला प्रिय हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असल्याने हे शब्द विधेयपूरक आहेत.

अशा प्रकारे वरील पर्यायांपैकी फक्त क हा पर्याय अचूक आहे.

Updated on:21/07/2023