चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो. विभक्तीचा अर्थ कोणता?
संबंध
करण
कर्म
कर्ता
संबंध
करण
कर्म
कर्ता
करण - वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. करण म्हणजे क्रियेच साधन होय.
चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो या वाक्यात चित्र काढण्याची क्रिया कुंचल्याने म्हणजेच ब्रश या साधनाने होत आहे म्हणून कुंचल्याने या शब्दाची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.
क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना जर ने, ए, शी, नी हे प्रत्यय असतील तर विभक्ती तृतीया असते. तृतीयेचा कारकार्थ करण (साधन) असतो.
Key Points कर्ता - क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास कर्ता असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो. उदा. अमित पेरु खातो.
कर्म - कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते.
द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो. उदा. राम रावणास मारतो.
Additional Information नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात.
विभक्ती
एकवचन
अनेकवचन
कारकार्थ
प्रथमा
प्रत्यय नाहीत
प्रत्यय नाहीत
कर्ता
व्दितीया
स, ला, ते
स, ला, ना, ते
कर्म
तृतीया
ने, ए, शी
ने, ही, ई, शी
करण
चतुर्थी
स, ला, ते
स, ला, ना, ते
संप्रदान
पंचमी
ऊन, हून
ऊन, हून
अपादान
षष्ठी
चा, ची, चे
चा, ची, चे
संबंध
सप्तमी
त, ई, आ
त, ई, आ
अधिकरण
संबोधन
-
नो
संबोधन
कारक-
वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात. तसेच क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना उपपदार्थ असे म्हणतात.
विभक्तीचे मुख्य सहा कारकार्थ आहेत
कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान (वियोग), अधिकरण.