Question

‘मी बैलाला मारतो.’ या वाक्‍यातील कर्म ओळखून लिहा.

A

बैलाला

B

मी

C

मारतो

D

बैलाला मारतो

Text Solution
Verified by Experts

कर्म -  क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.

कर्ता - क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात.

क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

स्पष्टीकरण-

क्रिया कोणावर घडते? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे कर्म असते व क्रिया कोण करतो? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे कर्ता असतो.

मारण्याची क्रिया कोण करतो?

- मी

मारण्याची क्रिया कोणावर घडते?

- बैल 

म्हणजे -   मी - कर्ता

              बैल  - कर्म

अशाप्रकारे या स्पष्टीकरणावरून ‘मी बैलाला मारतो.’ या वाक्‍यातील कर्म बैल आहे असे समजते.