Question

'तो नेहमी लवकर झोपतो' या वाक्यातील काळ ओळखा.

A

साधा वर्तमानकाळ

B

चालु वर्तमानकाळ

C

पूर्ण वर्तमानकाळ

D

रीति वर्तमानकाळ

Text Solution
Verified by Experts

काळ - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात.

काळाचे  मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. वर्तमानकाळ 
  2. भूतकाळ 
  3. भविष्यकाळ 

वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात.

  1. साधा 
  2. अपूर्ण 
  3. पूर्ण 
  4. रीती 

रीती वर्तमानकाळ - रीती वर्तमानकाळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते.

अशा प्रकारे 'तो नेहमी लवकर झोपतो' या वाक्यातील काळ रीती वर्तमान काळ आहे.