Question

बाग, मजा, ढेकर या शब्दांचे लिंग कोणते?

A

पुल्लिंगी

B

स्त्रीलिंगी

C

पुल्लिंगी व स्त्रीलिंगी

D

नपुसकलिंगी

Text Solution
Verified by Experts

लिंगनामावरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे की या दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही हे कळते त्यालाच लिंग असे म्हणतात.

लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंग 
  2. स्त्रीलिंग 
  3. नपुंसकलिंग 

) पुल्लिंगनामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंगी असे म्हणतात.

उदा : राम, मुलगा 

) स्त्रीलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.

उदा :  मुलगी, नदी 

) नपुंसकलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा : फुल, घड्याळ 

वरील शब्दांचे लिंग - 

  1. बाग - स्त्रीलिंग
  2. मजा - स्त्रीलिंग
  3. ढेकर - पुल्लिंगी 

अशा प्रकारे वरील बाग ,मजा ,ढेकर या शब्दांचे लिंग पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे .