Question

'जो काम करेल, तो यश मिळवील' या वाक्यातील 'जो' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

A

प्रश्नार्थक सर्वनाम

B

दर्शक सर्वनाम

C

संबंधी सर्वनाम

D

पुरुषवाचक सर्वनाम

Text Solution
Verified by Experts

वरील वाक्यातील जो हे संबंधी सर्वनाम आहे.

Key Points जो,जी,जे,ज्या या सर्वनामांनी जोडलेली वाक्ये मिश्रवाक्ये असतात. वरील विधान मिश्रवाक्य आहे. हे सर्वनाम असणारे वाक्य गौण वाक्य असते, तर त्याला जोडून येणारे वाक्य मुख्य वाक्य असते. जो,जी,जे,ज्याचे वाक्य विशेषण वाक्य असते.

संबंधी सर्वनाम - वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात. ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात. उदा - जो, जी, जे, ज्या.

Additional Information वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामाचे एकूण मुख्य सहा प्रकार आहेत.

1. पुरुषवाचक सर्वनाम

2. दर्शक सर्वनाम

3. संबंधी सर्वनाम

4. प्रश्नार्थक सर्वनाम

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम

6. आत्मवाचक सर्वनाम

1. पुरुषवाचक सर्वनाम - पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात.

प्रथम पुरुषवाचक सर्वनाम - बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. उदा. मी, आम्ही, आपण, स्वत:

वाक्य - मी मुंबईला जाणार आहे.

व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, तुम्ही, आपण, स्वतः इ

वाक्य - तुम्ही घरी कधी येणार आहात?

तृतीय पुरुषवाचक सर्वनाम - जेव्हा बोलणारा दुसर्‍या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्‍या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदा. तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.

वाक्य - ते सर्वजण इथेच येत आहेत.

2. दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते.

. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम - कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदा.कोणी कोणास हसू नये. या सर्वनामांना सामान्य सर्वनाम असेसुद्धा म्हणतात.

4. आत्मवाचक सर्वनाम - आपण, स्वतः या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. उदा. मी स्वतः त्याला पाहिले.

5. प्रश्नार्थक सर्वनाम - ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. असा प्रश्न विचारल्यास उत्तर नाम येते. उदा. कोण, काय, कोणी

Updated on:21/07/2023