Question

वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. a. तारे तोडणे i. फार जवळ येणे b. तोंड टाकणे ii. नवल करणे c. तोंडात बोट घालणे iii. अद्वातद्वा बोलणे d. तोंडावर येणे iv. वेड्यासारखे बोलणे

A

a - iv, b - ii, c - i, d - iii

B

a - iii, b - iv, c - ii, d - i

C

a - iii, b - iv, c - i, d - ii

D

a - iv, b - iii, c - ii, d - i

Text Solution
Verified by Experts

उत्तर - a - iv, b - iii, c - ii, d - i हे योग्य उत्तर होईल.

तारे तोडणे याचा अर्थ वेड्यासारखे बोलणे असा होतो.

वाक्यात उपयोग - सुरेशने सभेत भाषण करताना मूळ विषय सोडून इतर विषयात तारे तोडले.

तोंड टाकणे याचा अर्थ अद्वातद्वा बोलणे असा होतो.

वाक्यात उपयोग - प्रिती नेहमी रागाने आपल्या घरच्यांसोबत तोंड टाकून बोलत असे.

तोंडात बोट घालणे याचा अर्थ नवल करणे असा होतो.

वाक्यात उपयोग - लहान मुलाने श्लोक बोलून दाखविल्यावर उपस्थित लोकांनी तोंडात बोटे घातली.

तोंडावर येणे याचा अर्थ फार जवळ येणे असा होतो.

वाक्यात उपयोग - अमितची सुट्टी संपून त्याची कॉलेजची परीक्षा आता तोंडावर आली होती.

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.