Question

म्हणून, सबब, करीता इत्यादी शब्दारुपावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो? अ. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ब. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय क. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ड. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

A

अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक

B

ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक

C

क फक्त बरोबर बाकी सर्व चूक

D

ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

Text Solution
Verified by Experts

स्पष्टीकरण-

म्हणून, सबब, करीता इत्यादी शब्दारुपावरून परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा बोध होतो.

Important Points परिणामबोधक उभयान्वयी अव्यय- पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.

उदा. म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, की

वाक्य - तो आजारी होता; म्हणून कामावर आला नाही.

Key Points उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात.

1. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये - अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये म्हणतात. जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. याचे खालील चार प्रकार पडतात.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

समुच्चयबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. उदा. आणि, व, शिवाय, आणिक, अन

विकल्पबोधक - या उभयान्वयी अव्ययाने पर्याय, निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते. उदा. अथवा, किंवा, की, अगर

न्यूनत्वबोधक - पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. उदा. पण, परंतु, परी, बाकी, किंतु

परिणामबोधक - पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो तेथे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात. उदा. म्हणून, सबब, याकरिता, यास्तव

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये - या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. याचे खालील चार प्रकार पडतात.

गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये

स्वरुपबोधक - उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्ये करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा. की, म्हणून, म्हणजे, जे

कारणबोधक - जेव्हा कारण, का, की या अव्ययांमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. उदा. कारण, कारण की,

उद्देशबोधक - जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतु दर्शविला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदा. म्हणून, यास्तव, सबब

संकेतबोधक - गौण वाक्यात अट दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम असतो तेव्हा संकेतबोधक अव्ययांचा उपयोग केला जातो. उदा. जर-तर, म्हणजे, की