Question

'रामा फार उतावळा आहे' या वाक्यातील 'उतावळा' या विशेषणाचे विशेषण ओळखा.

A

रामा

B

आहे

C

फार

D

उतावळा

Text Solution
Verified by Experts

रामा फार उतावळा आहे या वाक्यातील उतावळा या विशेषणाचे विशेषण फार हे होईल. वरील वाक्यात रामा हे नाम आहे. उतावळा हे गुणवाचक विशेषण आहे तर फार हे उतावळा या विशेषणाचे विशेषण आहे आणि आहे हे क्रियापद आहे. फार या शब्दाचा वापर परिणामवाचक विशेषण म्हणून सुद्धा होतो तसेच क्रियाविशेषण म्हणून पण त्याचा वापर केला जातो.

Key Points नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही असला तरी तो विशेषण असतो तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो.

Additional Information नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

विशेषणाचे प्रकार प्रमुख तीन प्रकार - गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण

1. गुणवाचक विशेषण - नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. हिरवे रान, शुभ्र ससा, निळे आकाश. यांत हिरवे, शुभ्र आणि निळे ही गुणविशेषणे आहेत.

2. संख्या विशेषण - ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण

3. सर्वनामसाधित विशेषणे - एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास अशा सर्वनामास सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदा. असला नवरा नको ग बाई! या वाक्यात असला हे सार्वनामिक विशेषण आहे जे नवरा या नामापूर्वी वापरले गेले आहे.