Question

नामासर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो, त्याला काय म्हणतात?

A

वचन

B

प्रत्यय

C

विभक्ती

D

धातू

Text Solution
Verified by Experts

विभक्ती-

नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण आठ प्रकार पडतात.

विभक्ती

एकवचन

अनेकवचन

कारकार्थ

प्रथमा

प्रत्यय नाहीत

प्रत्यय नाहीत

कर्ता

व्दितीया

स, ला, ते

स, ला, ना, ते

कर्म

तृतीया

ने, ए, शी

ने, ही, ई, शी

करण

चतुर्थी

स, ला, ते

स, ला, ना, ते

संप्रदान

पंचमी

ऊन, हून

ऊन, हून

अपादान

षष्ठी

चा, ची, चे

चा, ची, चे

संबंध

सप्तमी

त, ई, आ

त, ई, आ

अधिकरण

संबोधन

-

नो

संबोधन

Additional Information वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात. तसेच क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना उपपदार्थ असे म्हणतात.

वचन - जेव्हा आपल्याला नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते.

मराठी व्याकरणात वचनाचे दोन प्रकार पडतात.

एकवचन - जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ.

अनेकवचन - जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ.

धातू - प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात. उदा. हस, बस इ.

Updated on:21/07/2023