Question

पुढील विधानांपैकी योग्य विधान : (a) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. (b) अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. (c) केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते.

A

(a) व (b) बरोबर, (c) चूक

B

(a) व (c) बरोबर, (b) चूक

C

(b) व (c) बरोबर, (a) चूक

D

(a) व (b) चूक, (c) बरोबर

Text Solution
Verified by Experts

उत्तर- (a) व (b) चूक, (c) बरोबर

(a) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते.

  • गवळी धार काढतो या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. जर गवळी काढतो एवढेच वाक्य दिले तर त्याचा अर्थ पूर्ण होणार नाही.
  • म्हणजेच काढतो या क्रियापदाला धार या कर्माची गरज आहे. म्हणून काढतो हे क्रियापद सकर्मक आहे.
  • यावरून असे दिसून येते की, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
  • अशा प्रकारे प्रथम विधान हे चूक आहे.

(b) अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते.

  • मी रस्त्यात पडलो या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. मी पडलो यात पूर्ण अर्थ आहे.
  • पडला या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही म्हणून पडलो हे अकर्मक क्रियापद आहे.
  • यावरून असा निष्कर्ष निघतो की, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर ते क्रियापद अकर्मक असते.
  • अशा प्रकारे हे विधान देखील चुकीचे आहे.

(c) केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते.

  • सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते.
  • कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधान पूर्ण होत नाही.
  • अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुदा पूर्ण होते.
  • अशा प्रकारे प्रस्तुत विधान योग्य आहे.

Updated on:21/07/2023